जिल्ह्यात विक्रमी संख्येत कोरोनाबाधीत रुग्ण आढळूनआले ; नवीन 601 कोरोनाबाधित रुग्णांची भर.

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत सर्व रेकार्ड मोडले असून जिल्ह्यात विक्रमी संख्येत कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 18297 एवढी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 129 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 12 कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 343 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना कहर सुरुच असून प्रादुर्भाव वाढतच आहे. पाचशेच्या आकडेवारीत येणारी रुग्णसंख्येने रविवारी सहाशेचाआकडा पार केला. रविवारी नव्याने 601 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णां मध्ये जळगाव शहर 129, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 13, अमळनेर 82 , चोपडा 41, पाचोरा 23 , भडगाव 27 , धरणगाव 29, यावल 8, एरंडोल 42, जामनेर 4 , रावेर 9, पारोळा 32, चाळीसगाव 57, मुक्ताईनगर 21, बोदवड 12 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यात 3, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी 2 व मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा धरणगाव आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे . अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत