सलग तिसर्या दिवशी कोरोनाचे 500 हून अधिक रूग्ण,सर्वाधिक जळगाव शहरात 141 रूग्ण आढळले
जळगाव: जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी 500 पेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहे. आज 571 नविन रूग्णांची भर पडली असुन
सर्वाधिक जळगाव शहरात 141 रूग्ण आढळले आहे. एकूण रुग्णसंख्या 15962
झाली आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हयात दिवसें दिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. बुधवारी नव्याने 571
कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये
जळगाव शहर 141, जळगाव ग्रामीण 47, भुसावळ 28, अमळनेर 17, चोपडा 56, पाचोरा 14, भडगाव 9, धरणगाव 40, यावल 17, एरंडोल 17, जामनेर 30, रावेर 16, पारोळा 30, चाळीसगाव 78, मुक्ताईनगर 21, इतर जिल्ह्यातील 10 अशी रूग्ण संख्या आहे.
दिवसभरात 8 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भुसावळ तालुक्यात 2, चोपडा,
पाचोरा, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, भडगाव तालुक्यात प्रत्येकी 1 रूग्णाचा
मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा
रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी
दिली आहे.

Comments
Post a Comment