जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी आकडा 500 पार.

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी 500 चा आकडा पार केला असून एकूण रुग्णसंख्येचा 15000 टप्पाही ओलांडला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 15391 झाली आहे. सर्वाधिक 94 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात 375 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

जिल्हयात दिवसें दिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. मंगळवारी नव्याने 528 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 8, अमळनेर 50, चोपडा 30, पाचोरा 17, भडगाव 48, धरणगाव 63, यावल 8, एरंडोल 51, जामनेर 50, रावेर 16, पारोळा 10, चाळीसगाव 45, मुक्ताईनगर 14, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2, जळगाव शहर, चोपडा, एरंडोल, व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी
दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत