जिल्ह्यात 870 कोरोनाबाधित रुग्ण आढळले,जळगाव शहरात सर्वाधिक 222 रुग्णांचा समावेश.

जळगाव- जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यंतचे सर्व रेकार्ड मोडले असून शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने 870 एवढे विक्रमी कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 21 हजार 97 झाली आहे. जळगाव शहरातही विक्रमी 222 कोरोबाधाीत रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला.  नव्याने 870 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 222, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 10, अमळनेर 44, चोपडा 84, पाचोरा 14, भडगाव 40, धरणगाव 71, यावल 25, एरंडोल 53, जामनेर 37, रावेर 86, पारोळा 37, चाळीसगाव 65, मुक्ताईनगर 3, बोदवड 5 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 4, अमळनेर, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी 2 तर चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत