जिल्ह्यात आणखी 169 कोरोना बाधित रूग्ण.


जळगाव:आज नव्याने १६९ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असुन जळगाव शहरात सर्वाधिक ७३ रुग्णांचा त्यात समावेश आहे.एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ५ हजार ४७१ झाली आहे. शुक्रवारी सर्वाधिक ७३ कोरोनाबाधीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ७३ , जळगाव ग्रामीण १६, भुसावळ १३, अमळनेर ९, चोपडा १३, पाचोरा ४, भडगाव ४, धरणगाव ६, यावल ७, एरंडोल १, जामनेर १०, रावेर ८, चाळीसगाव ४, बोदवड १ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बोदवड तालुक्यातील २, जामनेर, भडगाव, यावल आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत