आज नव्याने 305 कोरोना बाधित रूग्णांची भर पडली,सलग दुसर्‍या दिवशी त्रिशतक.

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी त्रिशतक केले असून 300 चा आकडा पार केला आहे. आज नव्याने 305 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने सात हजारांचाही टप्पा ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या 7275 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज दिवसभरात जिल्ह्यात 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 52, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 28, अमळनेर 4, चोपडा 20, पाचोरा 26, भडगाव 25, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 48, रावेर 20, पारोळा 22, चाळीसगाव 16, मुक्ताईनगर 09, बोदवड 9 व अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 13 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यातील 4, तर जळगाव ग्रामीण, चाळीसगाव आणि यावल या तालुक्यातील प्रत्येकी दोन , जामनेर व एरंडोल व जळगाव शहरातील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत