चिंताजनक जिल्ह्यात कोरोनाचा कहर,आज नव्याने 253 रुग्ण.एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5724 झाली आहे.

जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने 253 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असुन जळगाव शहरात सर्वाधिक 65 रुग्णांचा त्यात समावेश आहे. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5724 झाली आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 65 , जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 12, पाचोरा 8, धरणगाव 9, यावल 2, एरंडोल 3, जामनेर 30, रावेर 21, पारोळा 12 , चाळीसगाव 26, मुक्ताईनगर 19, बोदवड 12 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 6 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रावेर तालुक्यातील 2, जामनेर, पाचोरा, यावल आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत