आज नव्याने २०५ रूग्ण कोरोनाबाधित ; एकूण रूग्ण ६१६७

जळगाव:जिल्ह्यात आज नव्याने २०५ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार १६७ झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ५६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ १६, अमळनेर ८, चोपडा ९, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव २२, यावल ७, एरंडोल २३, जामनेर ५, रावेर ११, पारोळा १५, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ७, बोदवड ५, अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, रावेर, बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत