जिल्ह्यात आज १६९ कोरोना बाधित रूग्ण आढळले.
जळगाव:जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज नव्याने 169 रूग्ण आढळुन आले असुन जळगाव तालुक्यात सर्वाधिक 57 जणांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनामुळे आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडला असुन आत्तापर्यंत एकुण 4176 रूग्ण आढळुन आले आहे. आज नव्याने 169 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 57, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 9, अमळनेर 18, चोपडा 4, पाचोरा 1, भडगाव 3, धरणगाव 3, यावल 8, एरंडोल 14, जामनेर 14, रावेर 5, पारोळा 2,चाळीसगाव 2, मुक्ताईनगर 1 आणि बोदवड येथे 16 रूग्ण आढळुन आले आहेत.
Comments
Post a Comment