जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक,आज नव्याने 418 नविन रूग्ण.
जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 418 कोरोनाबाधित रूग्णांची
भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 8605 झाली आहे. सर्वाधिक 121 कोरोबाधाीत
रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात बुधवारी
नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 121, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 29, अमळनेर 15, चोपडा 45, पाचोरा 18, भडगाव 2, धरणगाव 25, यावल 16, एरंडोल 10, जामनेर 38, रावेर 33, पारोळा 5, चाळीसगाव 44, मुक्ताईनगर 2, बोदवड 3
अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 12 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला
आहे. यात जळगाव शहरातील 3, अमळनेर तालुक्यात 2, जळगाव तालुका, यावल,
रावेर, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येक
याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक यांनी दिली.

Comments
Post a Comment