आज जिल्ह्यात नव्याने 207 कोरोना बाधीत रूग्ण.
जळगाव: जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशीही 207 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5010 झाली आहे. जळगावात बुधवारी सर्वाधिक 39 कोरोना बाधीत रुग्ण हे अमळनेर शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.आज जळगाव शहर 22 , जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 8, अमळनेर 39, चोपडा 18, पाचोरा 10, भडगाव 1, धरणगाव 23, यावल 3, एरंडोल 18, जामनेर 1, रावेर 30, पारोळा 1, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 16, बोदवड 6 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील २, रावेर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, धरणगाव, भडगाव व मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
Comments
Post a Comment