जिल्ह्यात कोरोनाचा कहर:आज 304 कोरोनाबाधित रूग्णांची भर ,सर्वाधिक 107 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात.

जळगाव:जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा 300 चा आकडा पार केला असून आज नव्याने 304 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 7796 झाली आहे. सर्वाधिक 107 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात दहा कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकूण 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 107, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 19, अमळनेर 10, चोपडा 16, पाचोरा 21, भडगाव 5, धरणगाव 18, यावल 6, एरंडोल 4, जामनेर 21, रावेर 29, पारोळा 5, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 09, बोदवड 4 अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 10 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर तालुक्यात प्रत्येकी 2 तर पाचोरा, अमळनेर, भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत